Sunday 19 May 2013

Amrakhand Recipe: Amrakhand Recipe in Marathi

आम्रखंड रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी पिकलेल्या आंब्यांचा गर
  • १ वाटी ताजे दही
  • १/४ कप कनडेन्सड मिल्क
  • ४-५ बदाम
  • ४-५ पिस्ते
कृती:
  • बदाम आणि पिस्ते बारीक कापून घ्या
  • आंब्याचा गर, दही, कनडेन्सड मिल्क एकत्र मिक्सर मधून काढून घ्या
  • थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, सर्व्ह करताना त्यावर बदाम आणि पिस्ते टाका

Mango Rabri Recipe: Amba Rabdi Recipe in Marathi

आंब्याची रबडी रेसिपी


साहित्य:
  • २ वाटी दुध
  • दीड वाटी चिरलेला आंबा
  • साखर गरजेनुसार
  • ५-६ बदाम
  • ५-६ पिस्ते
  • वेलची पूड
  • केसर ४-५ पाकळ्या
कृती:
  • बदाम गरम पाण्यामध्ये भिजत घाला, थोड्यावेळाने साल काढून पातळ चिरून घ्या
  • पिस्त्याचे बारीक तुकडे करून घ्या
  • केसर २-३ चमच दुधात भिजत घाला
  • आंबा १/४ वाटी दुध घालून मिक्सर मधून काढून घ्या
  • राहिलेले दुध एका कढईत ओता, आणि ते जाड होईपर्यंत उकळत ठेवा
  • साखर घालून दुध हलवत राहा
  • साखर विरघळयावर गॅस बंद करा
  • दुध गार झाल्यावर त्यामध्ये, आंबा, बदाम, पिस्ते, केसर, वेलची पूड घाला
  • हे मिश्रण एक जीव करून फ्रीजमध्ये ठेवा
  • थंड झाल्यावर सर्व्ह करा

Mango Delight Recipe: Mango Delight Recipe in Marathi

आंबा डीलाईट रेसिपी


साहित्य:
  • २ पिकलेले आंबे
  • १ कप नारळाचे दुध
  • १/४ चमच वेलची पूड
  • साखर गरजेनुसार
कृती:
  • आंब्याची साल काढून त्याच्या गराची प्युरी बनवून घ्या
  • नारळाच्या दुधात, आंब्याची प्युरी, साखर, वेलची पूड घाला
  • बर्फाचे तुकडे घालून आंबा डीलाईट थंड-गार सर्व्ह करा

Gooseberry Fried Recipe: Fodniche Avle Recipe in Marathi

आंबट, गोड तिखट आवळे


साहित्य:
  • २५० ग्रॅम आवळे
  • दीड चमच तेल
  • अर्धा चमचा हळद
  • १ लहान चमचा लाल तिखट
  • मीठ चवीप्रमाणे
  • १ लहान चमचा बडीशेप
  • मेथीचे दाणे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा जिरे
  • २-४ लाल मिरच्या
कृती:
  • कुकरमधून आवळे वाफवून घ्या
  • बिया काढून त्याच्या फोडी करा
  • कढईत तेल गरम करा त्यात जिरे, मोहरी, बडीशेप मेथीचे दाणे, लाल-तिखट घाला
  • त्यात लाल मिरचीचे तुकडे टाका
  • हळद, मीठ घालून मंद आचेवर शिजू द्या
  • अधून-मधून हलवत राहा
  • आपला वेगळा असा चट-पटीत आवळा तयार आहे

Litchi Sharbat Recipe: Litchi Sharbat Recipe in Marathi

थंड गार लीची सरबत रेसिपी


साहित्य:
  • ३०० ग्रॅम लीची
  • १ वाटी पाणी
  • २-३ चमच मध
कृती:
  • लीचीचा फक्त गर एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून काढून घ्या
  • त्यार झालेला रस गाळून घ्या
  • त्यामध्ये मध घाला, फ्रीजमध्ये थंड करत ठेवा
  • थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा

Muskmelon Sharbat Recipe: Kharbuja Sharbat Recipe in Marathi

ख़रबुजा सरबत् रेसिपि


साहित्य:
  • २ वाटी कापलेले ख़रबुजाचे तुकडे
  • दीड वाटी पाणी
  • ३ चमच मध
कृती:
  • ख़्ररबुज पाण्यात टाकून मिक्सर मधून फिरवून घ्या
  • मिक्सरमधील रस पातल कपडयाने गालून घ्या
  • त्याम्ध्ये मध टाकून एक जिव करा
  • थोडा वेळ फ्रिजमध्ये गार करत ठेवा
  • थोडे आईस क्युब्स टाकून सर्व्ह करा

Sunday 12 May 2013

Kokam Sarbat Recipe: Kokam Sarbat Recipe in Marathi

कोकम सरबत रेसिपी


साहित्य:
  • १ कप कोकम
  • २ कप पाणी
  • २ कप साखर
  • ५-६ वेलची पूड
  • १ भाजलेली चमचा जिरेपूड
  • १-२ चिमुट काळे मिठ किंवा मिठ
कृती:
  • पाण्यात कोरडे कोकम स्वच्छ धुवा
  • २ कप पाण्यामध्ये कोकम ३-४ तास भिजत ठेवा
  • फक्त भिजलेला कोकम ब्लेन्ड करून घ्या, उरलेला पाणी तसच ठेवा
  • थोडं भिजवत ठेवलेलं पाणी ब्लेंडर मध्ये घाला आणि पुन्हा कोकम ब्लेंड करून घ्या
  • उरलेल्या पाण्यात २ कप साखर घाला, साखर घातलेलं मिश्रण व्यवस्थित उकळवून घ्या
  • पाकासारखे घट्ट होऊ द्या हे मिश्रण, नंतर ते थंड होऊ द्या आणि त्यामध्ये ब्लेंड केलेला कोकम घाला
  • त्यामध्ये वेलची पूड, जिरेपूड आणि मीठ घालून हे कोकम सिरप एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा
  • सर्व्ह करताना, एका ग्लास मध्ये २-३ चमचे कोकम सिरप घ्या त्यामध्ये १ ग्लास पाणी आणि बर्फाचे तुकडे घाला, झकास कोकम सरबत तयार

Friday 10 May 2013

Chicken Korma Recipe in Marathi: चीकेन कोरमा रेसिपी

झणझणीत चिकन कोरमा रेसिपी


साहित्य:
  • १ किलो चिकन
  • तेल
  • ५-६ चमचे तूप
  • ३ चमचे जिरे
  • ७-८ वेलची
  • ५-६ लवंग
  • ३ चमचे लसुन पेस्ट
  • २ चमचा धने पावडर
  • २ चमचा लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • दीड कप दही फेटलेले
  • २ चमचे आले पेस्ट
  • दीड कप कांदे चिरलेले
  • दीड चमचा मटण मसाला
  • २ चमचे केसरी रंग
कृती:
  • पॅन मध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये वेलची, लवंगा, लसूण घाला आणि नीट परतून घ्या
  • नंतर त्यामध्ये चिकन घाला आणि ४-५ मिनिटांसाठी परतत राहा
  • त्यामध्ये धणे पावडर, आले पेस्ट, लाल तिखट, तळलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून २-३ मिनिटे परतून घ्या
  • नंतर त्यामध्ये फेटलेलं दही घालून २ मिनिटे परतून घ्या, चिकन मसाला आणि केशरी रंग घाला
  • रस्सा अति घट्ट असल्यास थोडा गरम पाणी घालून मंद आचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्या
  • गरम गरम कोरमा कोथिंबीर घालून सजवा आणि भाकरी किंवा गरम भाताबरोबर सर्व्ह करा

Sunday 5 May 2013

Mixed Green Vegetable Vada: Palebhaji Vade in Marathi

मिक्स्ड पालेभाजीचे वडे


साहित्य:
  • १ कप मूल्याची पाने
  • १ कप पालक
  • १/२ कप मेथीची पाने
  • १/२ कप फ्लॉवरची पाने
  • १/२ कप कोथिंबीर
  • १ कप कोबी
  • १ कप रागीचे पीठ
  • १/२ कप कणिक
  • १/२ कप बेसन
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • १/२ चमचा लिंबाचा रस
  • तळण्यासाठी तेल
  • चवीनुसार मीठ
कृती:
  • सर्व पालेभाज्या चिरून धुवून घ्या
  • रागीचा पीठ, कणिक आणि बेसन एकत्र करून चाळून घ्या
  • एका बाउलमध्ये सर्व भाज्या, चाळलेले पीठ, मीठ लिंबाचा रस, मिरची पाणी घालून एकत्र करून घ्या
  • एकत्रित केलेल्या कणकेचे गोल चपटे वडे बनवून, मंद आचेवर तळून घ्या
  • गरम-गरम वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा

Saturday 4 May 2013

Almond Biscuits (Cookies) Recipe: Badam Biscuit Recipe in Marathi

बदाम बिस्कीट


साहित्य:
  • ३ मोठे चमचे पिठी साखर
  • ५ मोठे चमचे मैदा
  • २ मोठे चमचे तूप
  • २-३ थेंब बदाम इसेन्स
  • २-३ लहान चमचे दुध
  • चिमुटभर बेकिंग पावडर
  • बदाम
  • मीठ
कृती:
  • तूप व साखर फेटून घ्या
  • मैदा, मीठ व बेकिंग पावडर चालून मिक्स करून घ्या
  • इसेन्स व दुध मिक्स करून, एका पोलिथिन मध्ये गुंडाळून १५-२० मिनिटे ठेवून, नंतर लाटून घ्या
  • आवडीच्या आकारामध्ये कापून बेक करा
  • बेक करण्यापूर्वी अंड्यातील पिवळ्या बलकाने किंवा लोण्याने ब्रश करा व बिस्कीटावर बदाम लावा
  • बेक केलेले बिस्कीट, चहा किंवा दुधाबरोबर सर्व्ह करा

Bread Halwa Recipe: Jhatpat Bread Halwa Recipe in Marathi

ब्रेडचा हलवा रेसिपी


साहित्य:
  • ८-१० ब्रेड स्लाईस
  • २-३ मोठे चमचे साजूक तूप
  • १/४ कप साखर
  • ७-८ बदाम
  • ७-८ काजू
  • २-४ हिरव्या वेलची
कृती:
  • स्लाईसचे लहान-लहान तुकडे कापून घ्या.
  • कढईत तूप गरम करून त्यात ब्रेडचे तुकडे परतून घ्या
  • कुरकुरीत झालेल्या ब्रेडचे लहान-लहान तुकडे करून घ्या
  • नंतर त्यामध्ये साखर, वेलचीपूड, दीड कप पाणी टाकून ढवळत हलवा भाजून घ्या
  • काजू-बदाम घालून रेसिपी सजवून सर्व्ह करा

Bread Barfi Recipe: Shahi Tukda Bread Barfi Recipe in Marathi

ब्रेड बर्फी रेसिपी


साहित्य:
  • ४-५ ब्रेड स्लाईस
  • २-३ मोठे चमचे दुध पावडर
  • १/२ कप पनीर
  • १/४ कप किसलेले सफरचंद
  • तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप
  • ७-८ बदाम
  • ७-८ काजू
कृती:
  • तेल किंवा तूप गरम करा.
  • ब्रेड स्लाईस आवडीनुसार कापून घ्या.
  • गरम तेलात कापलेले ब्रेड स्लाईस तळुन घ्या आणि ब्राऊन पेपरवर काढून घ्या.
  • पनीर,दुध पावडर, किसलेलं सफरचंद एकत्र मिक्स करा.
  • या मिश्रणाचा थर तळलेल्या तुकड्यांवर लाऊन घ्या.
  • सुका मेव्यानी सजून खायला घ्या.

Popular Recipes