Showing posts with label dal palak recipe in marathi. Show all posts
Showing posts with label dal palak recipe in marathi. Show all posts

Friday 7 June 2013

Spinach Yellow Lentils Recipe: Dal Palak Recipe in Marathi

डाळ पालक रेसिपी


साहित्य:
  • तीन वाटी चिरलेला पालक
  • एक वाटी मुगडाळ
  • एक बारीक चिरलेला कांदा
  • अर्धा चमचा जिरे
  • अर्धा चमचा मोहरी
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा चाटमसाला
  • चिमुटभर मिरेपूड
  • चिमुटभर हिंग
  • अर्धा चमचा लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार तेल
Dal palak
कृती:
  • प्रथम पालक धुवून चिरून घ्या.
  • मुगडाळ धुवून भिजत ठेवा.
  • कढई मध्ये तेल गरम करा त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतवून घ्या.
  • नंतर त्यामध्ये चिरलेला पालक व भिजवलेली मुगडाळ टाकून परतवून घ्या.
  • चवीनुसार मीठ, मिरेपूड, व आवश्यकतेनुसार पाणी घालून ५ मिनिटे शिजवून घ्या.
  • शिजत आल्यावर चाट मसाला व लिंबूचा रस घालुन गरम गरम सर्व्ह करा.

Popular Recipes