Sunday, 9 June 2013

Chinese Bhel Recipe in Marathi: चायनीज भेळ रेसिपी

चायनीज भेळ रेसिपी


साहित्य:
 • १ कप कुरमुरे
 • ७-८ पापडी
 • १ चिरलेला कांदा
 • १ चिरलेली काकडी
 • चवीनुसार सोय सॉस
 • चिल्ली सॉस
 • टोमॅटो सॉस
 • व्हिनेगर
 • २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • १/२ कप मोड आलेले मूग
 • १ कप उकडलेले नूडल्स
 • १ कप मिक्स्ड भाज्या चिरलेल्या (भोपळी मिरची, कोबी, गजर, कांदा)
 • १ मोठा चमचा तेल
 • मीठ चवीनुसार
 • काळीमिरेपूड चवीनुसार
कृती:
 • तेल गरम करून चिरलेल्या भाज्या परतून घ्या.
 • त्यात मिरच्या, मीठ व नूडल्स मिसळा.
 • त्यात थोडं सोय सॉस, व्हिनेगर, व चिल्ली सॉस मिसळा.
 • थोडा वेळ थंड होऊ द्या.
 • नूडल्स व उरलेले सर्व साहित्य मिसळून, सर्व्हिंग डिश मध्ये सर्व्ह करा.

Popular Recipes

Daily & Occasional Recipes   © 2008. Template Recipes by Emporium Digital

TOP